‘कौटुंबिक न्यायालयात सहकार्य आवश्यक’
By Admin | Updated: August 30, 2015 23:12 IST2015-08-30T23:11:52+5:302015-08-30T23:12:54+5:30
‘कौटुंबिक न्यायालयात सहकार्य आवश्यक’

‘कौटुंबिक न्यायालयात सहकार्य आवश्यक’
नाशिक : कौटुंबिक न्यायालयातील खटले संवेदनशील असून, जास्तीत-जास्त काम करण्यासाठी वकिलांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात नांदेड येथून बदलून आलेल्या न्यायाधीश कविता ठाकूर यांनी केले़ नाशिक बार असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या़
नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश कविता ठाकूर बदलून आल्या असून, १ आॅगस्टपासून त्यांनी कामास सुरुवातही केली आहे़ नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ नितीन ठाकरे यांनी वकिलांच्या सहकार्याचे आश्वासन देत ठाकूर यांचा सत्कार केला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे पदाधिकारी अॅड़ हेमंत गायकवाड यांनी केले़ यावेळी अॅड़ बर्वे, अॅड़ धर्मेंद्र चव्हाण, अॅड़ वर्षा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन अॅड़ बाळासाहेब आडके यांनी केले़ आभार अॅड़ अपर्णा पाटील यांनी मानले़
यावेळी अॅड़ दीपक ढिकले, पूनम तांबट, अॅड़ प्राजक्ता कुलकर्णी, अॅड़ शिरीष पाटील, अॅड़ प्रेमनाथ पवार, अॅड़वैद्य, अॅड़ अरुण धोपावकर यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)