घोटाळे करणाºयांनी शेतकºयांच्या विषयावर बोलूच नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:27 IST2018-03-12T01:27:23+5:302018-03-12T01:27:23+5:30
नाशिक : जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.११) पलटवार केला. अनेक वर्षे सत्ता उपभोगणाºया शरद पवारांना शेती आणि शेतकºयांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका फरांदे यांनी केली आहे.

घोटाळे करणाºयांनी शेतकºयांच्या विषयावर बोलूच नये
नाशिक : जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.११) पलटवार केला. अनेक वर्षे सत्ता उपभोगणाºया शरद पवारांना शेती आणि शेतकºयांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका फरांदे यांनी केली आहे.
हल्लाबोल आंदोलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री व भाजपावर झालेल्या बोचºया टीकेला प्र्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी (दि. ११) वसंतस्मृती कार्यालयात अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देत पक्षाची भूमिका मांडली.