सदोष विजबिलांचा ग्राहकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:03 IST2018-08-29T16:03:14+5:302018-08-29T16:03:32+5:30

कळवण - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कळवण शहर व तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त झाले असून वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

False Shock customers | सदोष विजबिलांचा ग्राहकांना शॉक

सदोष विजबिलांचा ग्राहकांना शॉक

कळवण - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कळवण शहर व तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त झाले असून वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शहर व तालुक्यातील वीज ग्राहक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. अनेक ग्राहकांना अव्वाच्या सवा रकमेची वीज बिले येत आहेत. अनेक ग्राहकांनी भरमसाठ वीज बिल येत असल्याबद्दल तक्र ारीही केल्या. वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले आली असल्याने महावितरणच्या रिडींग घेणाऱ्या कार्यप्रणालीच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत आहे. अंदाजे टाकलेल्या आकडेवारीमुळे अचानक वाढून आलेल्या विजबिलांचा ग्राहकांना शॉक बसत आहे.गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चुकीच्या पद्धतीने रिडींग घेण्यात आल्याने अनेक ग्राहकांच्या बिलात आश्चर्यकारकरित्या वाढ झाली असून बिले कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे.मात्र एकाचवेळी बहुतांश ग्राहकांना वीजिबले वाढीव आलेली असताना बिल कमी करण्यासाठी महावितरणचे उंबरठे झुंजविणाºया नागरिकांना अर्जफाटे करावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असुन चुकीचे रिडींग नोंदवणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना वीज बिलांच्या वाढलेल्या आकड्यांमुळे घाम फुटला असून कळवण तालुक्यातील विविध गावातील घरगुती वीज ग्राहकांचे युनिट अव्वाच्या सव्वा वाढविली असून मागील मिहन्यांची युनिट,वीज बिलावर नोंदवलेली युनिट आण िचालू युनिट यात प्रचंड तफावत असल्याने वीजिबले वाढून येत आहेत.रिडींग चुकीच्या पद्धतीने घेतले कि अंदाजे टाकले याचा शोध घेण्याची मागणी होत असून वीजिबले कमी करण्यासाठी सर्वसामान्य व वयोवृद्ध ग्राहकांना महावितरणच्या पायर्या झजिवाव्या लागत आहेत.

Web Title: False Shock customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक