गोठ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य

By Admin | Updated: February 9, 2017 00:46 IST2017-02-09T00:46:42+5:302017-02-09T00:46:56+5:30

गोठ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य

False empire due to stagnant | गोठ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य

गोठ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य

इंदिरानगर : परिसरातील नागरिक त्रस्तइंदिरानगर : श्रद्धाविहार कॉलनीतून जनावरांचे मलमूत्र घेऊन जाणाऱ्या वाहनांमुळे घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थीवर्ग व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने मलमूत्र वाहून नेणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
श्रद्धाविहार कॉलनीत माध्यमिक विद्यालय आणि दोन महाविद्यालये असल्याने शेकडोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु परिसरात असलेल्या गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र घेऊन जाण्यासाठी नेहमीच ट्रक येतात. त्या ये-जा करताना रस्त्यावर मलमूत्र सांडत जात असल्याने परिसरात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. परिसरातील रहिवाशांना घराची दारे व खिडक्या उघडणेसुद्धा मुश्किल झाले आहे. तसेच पादचारी आणि विद्यार्थी वर्गाला ये-जा करताना नाक दाबून मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभाग दखल घेत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: False empire due to stagnant