शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

तोड कामगारांअभावी ऊस शेतातच पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:36 IST

चांदोरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चांदोरी :(आकाश गायखे)  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदाकाठ भागात मागील वर्षी चांगला प्रमाणात पाऊस झाला. त्याबरोबरच महापुराचादेखील फटका बसला. पाणी मुबलक असल्यामुळे करंजगाव, चांदोरी, सायखेडा, कोठुरे, सोनगाव, शिंगवे, चापडगाव, भुसे, नांदूरमधमेश्वर, लालपाडी, दारणा सांगवी, चाटोरी, भेंडाळी, म्हाळसाकोरे, तामसवाडी आदी गावात ऊस लागवड केली जाते.गोदाकाठच्या या गावातील भागांमध्ये काळ्या जमिनीचे क्षेत्र असल्याने या ठिकाणी उसाचीमोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बऱ्याच दिवसांपासून रासाका व निसाका हे दोन साखर कारखानेकाही वर्षांपासून बंद असल्यामुळे मागील काही वर्षांपासून ऊस उत्पादक पर्याय म्हणून रसवंतीसाठी लागणारा नरम ऊस व रसवंतीसाठी लागणाºया उसाची लागवड करीत आहेत.----------------------------------रसवंतीगृहासाठीचा ऊसही अडचणीत४रसवंतीगृहासाठी लागणारा ऊस साधारण दहा ते अकरा महिन्यात रस तयार करण्यासाठी तयार होतो तर त्यासाठी एकदम सरळ न पडलेला असाच ऊस फक्त रसवंतीसाठी पसंत केला जातो, पण मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. अजूनही परत १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढल्याने तोडणीसाठी आलेला ऊस तोडता येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कारण रसवंतीसाठी लागवड केलेल्या उसाचे क्षेत्र साधारण १० ते ११ महिन्यांत शेत खाली होते व साधारण ३५०० ते ४००० रु पये टन याप्रमाणे बांडीसह दर मिळतो व थोड्याच दिवसांत बºयापैकी पैसे मिळून शेतीसाठी भांडवल उपलब्ध होते, पण हाच ऊस तोडता येत नसल्याने आता पुढील हंगामातील पिकासाठी भांडवल उभे करायचे कसे ? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.-----------------------------तालुक्यातील निफाड व रानवड दोन्ही कारखाने बंद असल्याने अगोदरच आपल्या उसाला इतर कारखाने त्यांच्या सवडीत नेतात. त्यात कोरोनामुळे इतर कारखानेदेखील लवकरच बंद झाले आणि रसवंती पण बंद असल्याने बºयाच शेतकºयांचा ऊस शेतात तसाच आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. म्हणून मायबाप सरकारने शेतकºयांना मदतीचा हात देऊन उभारी देण्याची गरज आहे. तेव्हाच तो पुढील हंगामात टिकू शकतो.- भगवान भोज, ऊस उत्पादक शेतकरी------------------------------------------यंदा लॉकडाउन असल्याने चांगल्या दर्जाचा ऊस हा अतिशय तुटपुंज्या दरात घ्यावा लागत आहे. रसवंती गृह बंद असल्याने ऊस विक्ती ची महत्वाची बाजार पेठ बंद असल्याने मोठी आर्थिक झळ शेतकरी व स्थानिक व्यापारी वर्गाला बसत आहे.- शुभम बोरस्ते,

----------------------------ऊस व्यापारी, चांदोरी ऊस तोडणार तरी कधी ?कोरोनाच्या धर्तीवर तिसºया टप्प्यातील संक्र मण तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन वाढविला असून, त्याचा फटका उसाबरोबरच द्राक्षपंढरीला बसला आहे. त्याचबरोबर, डाळिंब, कांदा, आंबा, मोसंबी , संत्री, टरबूज, खरबूज आदी फळे व भाजीपाला पिकांबरोबर ऊस शेतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. ऊस न तुटल्यास जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू नसल्याने पुढील येणाºया काळात कारखान्यांच्या भरोशावर साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखर कारखानेचालू होतील त्यावेळेस ते तोडले जातील, परंतु तोपर्यंत उसाच्या वजनात घट येईल, असे उत्पादकांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक