कांदा दरात पावसामुळे घसरण उत्पादकांना विक्र ीची झाली घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:03 IST2019-09-23T23:02:16+5:302019-09-23T23:03:21+5:30
वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या काहीशी घसरण कांदा दरात झाली असली तरी पावसामुळे उत्पादकांनी कांदा विक्रि साठी घाई केल्यामुळे लगबगीचे वातावरण उपबाजारात होते. आज सोमवारी २४१ वाहनांमधुन ६५०० क्विंटल कांदा विक्र ीसाठी उत्पादकांनी उपबाजारात आणला होता. कमाल ४२७३ किमान ३००० तर ३७०० एवढा सरासरी प्रति क्विंटलचा राहीला सोमवारी (दि.२३) जोरदार पावसाने हजेरी लावल्याने दुरवरु न कांदा विक्र ीसाठी आलेल्या उत्पादकांची तारांबळ उडाली.

कांदा दरात पावसामुळे घसरण उत्पादकांना विक्र ीची झाली घाई
वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या काहीशी घसरण कांदा दरात झाली असली तरी पावसामुळे उत्पादकांनी कांदा विक्रि साठी घाई केल्यामुळे लगबगीचे वातावरण उपबाजारात होते. आज सोमवारी २४१ वाहनांमधुन ६५०० क्विंटल कांदा विक्र ीसाठी उत्पादकांनी उपबाजारात आणला होता.
कमाल ४२७३ किमान ३००० तर ३७०० एवढा सरासरी प्रति क्विंटलचा राहीला सोमवारी (दि.२३) जोरदार पावसाने हजेरी लावल्याने दुरवरु न कांदा विक्र ीसाठी आलेल्या उत्पादकांची तारांबळ उडाली.
सकाळच्या सत्रात खरेदी विक्र ीचे व्यवहार पार पडल्याने दुपारच्या पावसाचा परिणाम तितकासा झाला नसला तरी पावसाने पुन्हा हजेरी लावली. तर यामुळे फारसे ताणण्याची भुमिका न घेता उर्वरीत खरेदी विक्र ी पार पाडण्यासाठी समन्वयाची भुमिका घेण्यात आली.
दरम्यान परतीच्या पावसाने अनपेक्षीत दणका दिल्याने चिंतातुर झालेल्या उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे.
दरम्यान साठवणुक केलेल्या कांद्याची पतवारी करताना ३०टक्के कांद्यावर पाणी सोडावे लागते. त्यात समाधानकारक दर मिळत असल्याने विक्र ीसाठी हीच योग्य वेळ असल्याची भावना उत्पादक व्यक््रत रीत आहेत.