लासलगाव बाजारात कांदा भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:58 PM2018-10-19T17:58:54+5:302018-10-19T17:59:30+5:30

देशाच्या मोठ्या बाजारपेठेतून मागणी कमी झाल्याने लासलगाव बाजार समितीत शुक्र वारी उन्हाळ कांदा भावात ६०६ रुपयांची घसरण झाली.

Falling onion in Lasalgaon market | लासलगाव बाजारात कांदा भावात घसरण

लासलगाव बाजारात कांदा भावात घसरण

Next

लासलगाव : देशाच्या मोठ्या बाजारपेठेतून मागणी कमी झाल्याने लासलगाव बाजार समितीत शुक्र वारी उन्हाळ कांदा भावात ६०६ रुपयांची घसरण झाली.
कमाल भाव १९१९ रुपये तर सरासरी भावात १०० रुपयांची घसरण होत भाव पूर्वपदावर आले. शुक्र वारी दिवसभरात ५५० वाहनातून कांदा आला. किमान भाव ८०० तर कमाल भाव १९१९ रुपये तर सरासरी भाव १६५० रुपये प्रतिक्विंटल होते. गुरुवारी दसरा असल्याने लिलाव बंद होते.
लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांदा भावात ४३० रुपयांची तेजी होऊन २५५० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला. मंगळवारी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ७००, कमाल २१२० तर सरासरी १७२० रुपये होते तर बुधवारी उन्हाळ कांदा आवक ४२५ वाहनातून झाली व बाजारभाव किमान ८०० ते कमाल २५५० तर भाव सरासरी २२०० रुपये होते.

Web Title: Falling onion in Lasalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.