दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही फिटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:46 IST2020-08-13T16:45:21+5:302020-08-13T16:46:31+5:30

मानोरी : दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. दूध दर वाढ करण्यासाठी अनेकदा आंदोलन, मागण्या करूनही दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

The fall in milk prices has also offset the cost to producers | दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही फिटेना

दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही फिटेना

ठळक मुद्दे दुग्ध व्यवसाय धोक्यात : शेतकरी चिंताग्रस्त

ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यास शेतकरी पसंती देतात. मात्र, सध्या दुधाचे दर प्रति लिटर १८ ते २० रु पये असा नीचांकी भाव मिळत असल्याने दूध व्यवसाय करणे अवघड बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या तर दुध उत्पादन खर्च भरून निघणे देखील कठीण झाले असून ‘दूध स्वस्त, पाणी महाग’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात जेमतेम पाण्यावर गायींना खाण्यासाठी घास, हिरवे गवत, मका आदी चारा तयार करीत आहेत. यासाठी खर्च करूनही दूधाचे दर जैसे थेच आहेत. दूध वाढीसाठी अनेक प्रकारची औषधे, ढेप, सरकीसारख्या खाद्यवस्तू खरेदी करावी लागतात. ढेपच्या पन्नास किलो पोत्याच्या दर सध्या बाराशे ते तेराशे रु पयांपर्यंत पोहोचले आहेत. एका गायीला ढेपचे एक पोते साधारण बारा ते पंधरा दिवस जाते. त्यात गायीचा दवाखाना व इतर खर्च विचारात घेता दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे.

Web Title: The fall in milk prices has also offset the cost to producers