उन्मळून पडलेल्या वृक्षांचा पालापाचोळा तसाच पडून

By Admin | Updated: May 30, 2014 01:04 IST2014-05-30T00:12:07+5:302014-05-30T01:04:56+5:30

पालिकेचे दुर्लक्ष : सरपणासाठी बांधल्या मोळ्या

The fall of the fallen trees remains unchanged | उन्मळून पडलेल्या वृक्षांचा पालापाचोळा तसाच पडून

उन्मळून पडलेल्या वृक्षांचा पालापाचोळा तसाच पडून

पालिकेचे दुर्लक्ष : सरपणासाठी बांधल्या मोळ्या
नाशिक : गेले दोन दिवस वादळी वार्‍याने शहरातील शेकडो वृक्ष उन्मळून पडले, तर अनेक ठिकाणी फांद्या तुटून पडल्या; मात्र अजूनही बर्‍याच ठिकाणी वृक्षांच्या तुटक्या फांद्या अन् पालापाचोळा तसाच पडून आहे. गोदाकाठावरील जॉगिंग ट्रॅककडे पालिकेने साफ दुर्लक्ष केले असून, तुटलेल्या फांद्या तशाच लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. आसपासच्या झोपडप˜ीतील महिलांची मात्र यामुळे सरपणाची सोय झाली असून, लाकडाच्या मोळ्या करून त्या घरी नेत आहेत.
गेल्या मंगळवारी आणि बुधवारी दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शहरातील सुमारे शंभरपेक्षा अधिक वृक्ष उन्मळून पडले, तर अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान तर झालेच; शिवाय अनेक रस्त्यांवरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मुख्य रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे हटविली, तर ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या होत्या ते हटविण्याचे काम महापालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदारांमार्फत करण्यात आले. असे असले तरी ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक ठिकाणी झाडांचा पालापाचोळा, मोडून पडलेल्या फांद्या तशाच पडून आहेत.
गोदापार्कवरील जॉगिंग ट्रॅकलगतच्या झाडांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी आजही फांद्या मोडून पडलेल्या तशाच लोंबकळत आहेत, तर ठिकठिकाणी पालापाचोळ्यांचे ढीग तसेच पडून आहेत. कॉलेजरोड, चोपडा लॉन्स रस्त्यावरही अशीच स्थिती आहे. पालिकेच्या दुर्लक्षपणामुळेच आजही रस्त्यालगतचा पालापाचोळा पडून असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चोपडा लॉन्सकडे जाणार्‍या रस्त्यालगत तसाच पडून असलेल्या झाडाच्या फांद्या.

Web Title: The fall of the fallen trees remains unchanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.