भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा अपहार

By Admin | Updated: June 3, 2014 23:32 IST2014-06-03T23:30:18+5:302014-06-03T23:32:57+5:30

भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा अपहार

Failure of provident fund amount | भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा अपहार

भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा अपहार

 

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एशियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या संचालकांनी कर्मचार्‍यांच्या वेतनातून कापलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरता तिचा अपहार केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, या कंपनीचे चेअरमन अरुण बाबुलाल शहा व इतर चार यांनी जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ या कालावधीत कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनातून ४ लाख ६९ हजार ७३१ रुपये कापले मात्र ते भाविष्य निर्वाह निधीत न भरता या रकमेचा परस्पर अपहार केला़ या प्रकरणी जेलरोड येथील दिलीप नाहू बडगुजर यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार शहा यांच्यासह चौघांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Failure of provident fund amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.