कारखान्यातील जबरी चोरीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST2021-06-29T04:11:48+5:302021-06-29T04:11:48+5:30

सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्ज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्समध्ये गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी डल्ला मारत पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह ...

Factory robbery case | कारखान्यातील जबरी चोरीचा छडा

कारखान्यातील जबरी चोरीचा छडा

सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्ज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्समध्ये गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी डल्ला मारत पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना घडली होती. शुक्रवारी सकाळी कंपनीचे संचालक दीपक आव्हाड यांच्या निदर्शनास ही घटना आली होती.आव्हाड यांनी सातपूर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करत शोध कार्य सुरू केले. दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार सातपूर पोलीस व गुन्हे शोध पथकच्या सहकार्याने दोघा संशयित्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार संजय शिंदे, विनायक आव्हाड, गुन्हे शाखेचे मोतीलाल महाजन, बेंडकुळे, गोकुळ कासार, अंनत महाले आदींनी चोख कामगिरी बजावत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. सदर संशयित आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Factory robbery case