औंदांणे : बागलाण तालुक्यातील शेत रस्ते व पाधन रस्त्यांसाठी मुरु म, खडी वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचा महसूल कर न आकारता सरसकट वाहतुकीस परवानगी मिळावी याबाबत बागलाण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.बागलाण तालुक्यात सर्वत्र भीज पाऊस झालेला आहे. पावसामुळे शेत रस्ते व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल माती व खड्डे तयार झालेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना शेतीमाल काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शेत रस्ते, पाधन रस्ते करण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. शेत रस्ता, पाधन रस्ता दुरूस्तीसाठी शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांना महसुल भरु न परवानगी काढण्यासाठी पैसे नाहीत. याकामी तहसीलदार यांना आदेश काढून या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी खडी, मुरु म वाहतुकीस परवानगी देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, माधव पगार, दत्तु खरे, योगेश आहीरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुरु म, खडी महसूल कर न आकारता वाहतुकीस परवानगी मिळावी : मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:13 IST
औंदांणे : बागलाण तालुक्यातील शेत रस्ते व पाधन रस्त्यांसाठी मुरु म, खडी वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचा महसूल कर न आकारता सरसकट वाहतुकीस परवानगी मिळावी याबाबत बागलाण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मुरु म, खडी महसूल कर न आकारता वाहतुकीस परवानगी मिळावी : मागणी
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन