दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:57 IST2019-12-06T00:55:37+5:302019-12-06T00:57:43+5:30
पेठ : हुतात्मा स्मारक परिसरात कारवाईपेठ : शहरातील अतिक्रमणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारी धडक मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या वाहनांचा ताफा हुतात्मा स्मारक परिसरात धडकला. अतिक्रमण-धारकांना आधीच कुणकुण लागल्याने हातोडा पडण्यापूर्वीच सामानाची आवरसावर सुरू करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढून घेण्याच्या अटीवर सूट देण्यात आली.

अतिक्रमणावर हातोडा...पेठ येथील हुतात्मा स्मारक परिसरात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्र मण काढताना नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी.
पेठ : हुतात्मा स्मारक परिसरात कारवाईपेठ : शहरातील अतिक्रमणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारी धडक मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या वाहनांचा ताफा हुतात्मा स्मारक परिसरात धडकला. अतिक्रमण-धारकांना आधीच कुणकुण लागल्याने हातोडा पडण्यापूर्वीच सामानाची आवरसावर सुरू करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढून घेण्याच्या अटीवर सूट देण्यात आली. दुपारी तहसील कार्यालय वसाहती जवळचे अतिक्र मण हटविण्यात आले. याप्रसंगी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने काही काळ बलसाड रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. दुपारनंतर पोस्ट कार्यालयाजवळ राहिलेले अतिक्रमण काढण्यात आले.
शासकीय इमारतींना विळखापेठ शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती व जिल्हा परिषद मालकीच्या विविध इमारती असून, अनेक वर्षांपासून या इमारती धूळ खात पडल्या असल्याने या ठिकाणी अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसला असून, संबंधित विभागाने अशा इमारती जमीनदोस्त करून संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी करण्यात येत आहे.