लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात डिसेंबरअखेर हमीभावाने सुमारे २२३७३ क्ंिवटल मक्याची खरेदी होऊ शकली असून, नोंदणी केलेल्या मक्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक मका अजूनही शेतकºयाच्या खळ्यावर पडून असल्याने शेतक-यांचा रोष टाळण्यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार शेतक-यांना त्याचा लाभ होणार आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली असली तरी, यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुस-या आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात ३१ डिसेंबरअखेर ५,४९२ शेतक-यांनी नोंदणी केली होती. त्यासाठी जिल्ह्यात दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. यंदा उशिरा पावसाचे आगमन झाल्यामुळे मक्याची काढणीही लांबणीवर पडली. परिणामी बहुतांशी शेतकºयांनी दिवाळीनंतर मका काढणीला घेतला. याच काळात खुल्या बाजारातही व्यापा-यांनी मका खरेदीला सुरुवात केली होती. खुल्या बाजारात १५०० ते १६०० रुपये क्विंटलमागे दर देण्यात येत असताना शासनाने हमीभावाने १७०० रुपये क्विंटल दर निश्चित केल्याने साहजिकच शेतक-यांचा कल खरेदी केंद्राकडे वाढला. तथापि, डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात खुल्या बाजारात मक्याचे दर १८५० पर्यंत गेल्याने शेतकºयांनी पुन्हा व्यापा-यांकडे धाव घेतली. त्यामुळे खरेदी केंद्रे जवळपास पंधरा दिवस ओस पडले. जेमतेम ७०६ शेतक-यांचा २२३७३ क्विंटल मक्याची खरेदी या काळात होऊ शकली. मात्र खुल्या बाजारातील मक्याचे दर पुन्हा आवक वाढल्याने कोसळले व ते दीडशे रुपयांची कमी झाल्याने शेतक-यांनी खरेदी केंद्रांवर गर्दी केली. परंतु शासनाने हमीभावाने मक्याच्या खरेदीसाठी ३१ डिसेंबरअखेरची मुदत असल्याने मका खरेदी थांबविण्यात आली. मात्र आॅनलाइन नोंदणी केलेल्या एकूण शेतक-यांपैकी दहा टक्केच शेतक-यांच्या मक्याची खरेदी महिनाभरात होू शकल्याने उर्वरित साडेचार हजार शेतक-यांकडे मका पडून असल्याने त्याबाबतचा अहवाल मार्केट फेडरेशनने शासनाला दिला होता. त्याची दखल घेऊन शासनाने १५ जानेवारीपर्यंत मका खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दहाही केंद्रांवर खरेदी सुरू राहील, असे जिल्हा मार्केट फेडरेशनचे पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नाशिक जिल्ह्यात शिल्लक मका खरेदीसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 18:23 IST
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली असली तरी, यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुस-या आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात ३१ डिसेंबरअखेर ५,४९२ शेतक-यांनी नोंदणी केली
नाशिक जिल्ह्यात शिल्लक मका खरेदीसाठी मुदतवाढ
ठळक मुद्दे२२ हजार क्ंिवटल खरेदी : हजारो शेतकऱ्यांकडे मका पडून