नाशिक मध्ये शिंदे गट रडारवर, माजी शिवसेना नगरसेवक श्याम साबळे यांची हकालपट्टी
By संजय पाठक | Updated: October 19, 2022 18:52 IST2022-10-19T18:51:48+5:302022-10-19T18:52:21+5:30
- संजय पाठक नाशिक - शिवसेनेतील फाटाफुट सुरूच असली तरी शिंदे गटाकडे जाणाऱ्यांवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची करडी ...

नाशिक मध्ये शिंदे गट रडारवर, माजी शिवसेना नगरसेवक श्याम साबळे यांची हकालपट्टी
- संजय पाठक
नाशिक- शिवसेनेतील फाटाफुट सुरूच असली तरी शिंदे गटाकडे जाणाऱ्यांवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची करडी नजर आहे. नाशिकमधील माजी शिवसेना नगरसेवक शामकुमार साबळे हे शिंदे गटाचे समर्थक असल्याने त्यांची आज हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ ड मधून ते गेल्या म्हणजेच २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. नाशिकचे
सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे ते समर्थक आहेत. भुसे यांनीच त्यांना उमेदवारी मिळवून दिल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, राज्यातील सत्तांतरापूर्वी सर्वप्रथम चाळीस आमदार फुटले त्यात दादा भुसे यांचा समावेश होता. त्यावेळी साबळे यांच्या वॉटस अप डीपीवर त्यांचाच फोटो होता.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेतील अनेक जण शिंदे गटात जाण्यास प्रारंभ झाला त्यावेळी साबळे यांच्या नावाची देखील चर्चा होती. त्यांनी
अद्याप शिंदे गटात प्रवेश केला नसला तरी ते शिवसेनेच्या केाणत्याही बैठकीत सहभागी झाले नव्हते तसेच निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले
नव्हते. त्यांची अखेरीस हकालपट्टी केल्याचे जाहिर करण्यात आले आहे.