शेतकरी उपोषणाची सांगता
By Admin | Updated: June 9, 2017 01:20 IST2017-06-09T01:19:50+5:302017-06-09T01:20:05+5:30
शेतकरी उपोषणाची सांगता

शेतकरी उपोषणाची सांगता
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : कर्जमाफी मिळावी यासाठी संपाबाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याने कारसूळचे उपसरपंच देवेंद्र काजळे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते. गुरुवारी रात्री खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणस्थळी काजळे यांची भेट घेतल्यानंतर काजळे यांनी उपोषण सोडले
तहसीलदारांना काजळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा संप सुरू आहे त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनदरबारी ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांत फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. संपकाळात शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांचे अटकसत्र थांबवावे, अखंडित वीजपुरवठा करावा, वीजबिल माफ करावे, ठिबक व तुषार सिंचनासाठी तसेच शेतीआधारित योजनांसाठी शंभर टक्के अनुदान मिळावे अशा मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत. यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते. शेट्टी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन काजळे याचे उपोषण सोडविले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले उपस्थित होते.