आजपासून मिठाईवर एक्सपायरी डेट बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:13 IST2020-09-30T22:45:51+5:302020-10-01T01:13:08+5:30
सातपूर : मिठाईच्या दुकांनात विनापकिंग विक्रीसाठी ट्रेमध्ये ठेवण्यात येणारी खुली मिठाई,दुग्धजन्य पदार्थ यांच्यावर बेस्ट बिफोर (एक्सपायरी डेट) टाकणे दि.1 आॅक्टोबर पासून बंधनकारक करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.

आजपासून मिठाईवर एक्सपायरी डेट बंधनकारक
सातपूर : मिठाईच्या दुकांनात विनापकिंग विक्रीसाठी ट्रेमध्ये ठेवण्यात येणारी खुली मिठाई,दुग्धजन्य पदार्थ यांच्यावर बेस्ट बिफोर (एक्सपायरी डेट) टाकणे दि.1 आॅक्टोबर पासून बंधनकारक करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली.
शहरातील मिठाई उत्पादक,विक्रेते आणि संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती देण्यात आली. विनापॅकिंग असणारा अन्न पदार्थ कधी बनविला,किंवा तो पदार्थ किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे.हे ग्राहकांना माहीत नसते. ट्रे मधील मिठाई व अन्न पदार्थ विक्री केले जातात. उघड्यावर ठेवलेली मिठाई,शिळे अन्न पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडतात.मुदत संपत असल्याची तारीख लिहील्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही. याबाबतचे आदेश केंद्र सरकारच्या अन्न व औषध पुरवठा विभागाने काढले आहेत.याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.यावेळी सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर उपस्थित होते.