शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पाच जिल्ह्यात प्रयोग : नाशिकचाही समावेश

By admin | Updated: August 24, 2016 01:19 IST

खतांचे अनुदान थेट खात्यात

गणेश धुरी ल्ल नाशिकगॅसचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर त्याची पुढील पायरी म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना संयुक्त खतांवर देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात पाच जिल्ह्यांत हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येणार असून, त्यात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे.शेतकऱ्यांना खतांच्या माहिती संदर्भात यापूर्वीच कृषी विभागाने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एमएफएमएस (मोबाइल फर्टिलायझर मुव्हमेंट सिस्टीम) प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया भ्रमणध्वनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली असून, भ्रमणध्वनीवर आवश्यक ती माहिती शेतकऱ्यांना मिळते आहे. आता गॅस अनुदानाप्रमाणेच खतांचेही अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यास, काही प्रमाणात बेकायदेशीर खते विक्रीला व खरेदीलाही चाप बसणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचे आधार कार्ड बॅँकेच्या खात्याशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची खते खरेदी करताना ती अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावती सोबत घ्यावी लागणार आहे. तूर्तास संयुक्त खतांवर केंद्र सरकारच्या वतीने अनुदान देण्यात येते. पन्नास रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना खतांच्या खरेदीवर हे अनुदान देण्यात येते. जिल्ह्णात सुमारे चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांची संख्या असून त्यातील जवळपास ९५ ते ९६ टक्के शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही अनुदान मिळण्यासाठी आधार कार्ड काढण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्णातील नोंदणीकृत खते विक्रेत्यांची यापूर्वीच बैठक घेण्यात आली असून त्यास नोेंदणीकृत ३५०० हजार खते विक्रेत्यांपैकी १६०० ते १७०० खते विक्रेत्यांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. उर्वरित विक्रेत्यांनाही या योजनेत समाविष्ट करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. देशात अवघ्या पाच जिल्ह्णांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत असून, त्यात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्णाचा समावेश आहे.