दुचाकींसह महागडी सायकल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:13+5:302021-02-05T05:38:13+5:30

ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शरद देवराम मानकर (रा. जयप्रकाश नगर, सिन्नर फाटा) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ...

Expensive bicycle lamps with two-wheelers | दुचाकींसह महागडी सायकल लंपास

दुचाकींसह महागडी सायकल लंपास

ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शरद देवराम मानकर (रा. जयप्रकाश नगर, सिन्नर फाटा) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. मानकर यांची दुचाकी (एमएच १५ डीएफ ७९६९) राहत्या इमारतीच्या वाहनतळातून चोरट्याने लांबविली.

दुसऱ्या घटनेत हेमंत तांबट यांची दुचाकी (एमएच १५ जीएन ७११९) शरण सोसायटी, पाण्याच्या टाकीजवळ उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी तांबट (रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत सविता संजय शिंदे (रा. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ, जेलरोड) यांची सायकल अज्ञात

चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या मुलाने १० हजार रुपये किमतीची सायकल राहत्या घराच्या पार्किंगमध्ये उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Expensive bicycle lamps with two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.