येवल्यात महाशिवरात्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:36 IST2021-03-11T22:14:26+5:302021-03-12T00:36:23+5:30

येवला : शहर परिसरात महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

In the excitement of Mahashivaratra in Yeola | येवल्यात महाशिवरात्र उत्साहात

श्रीमदनेश्‍वर महादेव मंदिर

ठळक मुद्देकाही ठिकाणी तर दर्शनासाठी रांगाही लागल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क लावून सकाळपासूनच शहरातील सर्वच ठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक दिसून येत होते.

काही ठिकाणी तर दर्शनासाठी रांगाही लागल्या होत्या. पुरातन श्रीमदनेश्‍वर महादेव मंदिर पररिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पाटीलवाडा परिसरातील मोठे महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. प्रसाद म्हणून केळी, साबुदाणा खिचडीचे वाटपदेखील काही शिव मंदिरात केले जात होते.
 

 

 

 

Web Title: In the excitement of Mahashivaratra in Yeola