"कोरोनामुक्ती जनजागृतीपर गणेशोत्सव" उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:33+5:302021-09-21T04:15:33+5:30
यापूर्वी जलसंवर्धनाचा गणेशोत्सव, तरुणीच्या सुरक्षिततेचा जनजागर, आर्थिक साक्षरतेचा गणेशोत्सव, जागतिक तापमान वाढविरोधी गणेश उत्सव, उत्तम आरोग्याचा जनजागर असे विविध ...

"कोरोनामुक्ती जनजागृतीपर गणेशोत्सव" उत्साहात
यापूर्वी जलसंवर्धनाचा गणेशोत्सव, तरुणीच्या सुरक्षिततेचा जनजागर, आर्थिक साक्षरतेचा गणेशोत्सव, जागतिक तापमान वाढविरोधी गणेश उत्सव, उत्तम आरोग्याचा जनजागर असे विविध विषय हाताळून समाजामध्ये विविध विषयांचा जनजागर केला आहे. या गणेशोत्सवात विश्वस्त भूषण लाघवे यांच्या संकल्पनेतून कोरोना मुक्ती जनजागृती गणेशोत्सव हा गंभीर विषय हाताळण्यात आला.
श्रींचे आगमन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. उत्सवाच्या काळामध्ये महाविद्यालयात प्रश्नमंजुषा, टेलिग्राम चॅनलचे उद्घाटन तसेच विश्वलता साप्ताहिक बातमीपत्राचे उद्घाटन करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवात युवकांची भूमिका हा ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री गणपतीचे विसर्जन पारंपरिक वेशभूषेत भारदस्त फेटा घालून, सुमधूर संगीतासह महाविद्यालयातील कमळ कुंडात झाले. कुंडाच्या अवतीभवती कोरोना जनजागृतीपर फलक होते. सुरक्षित अंतर ठेवा - मास्कचा वापर करा, लसीकरण करून घ्या, संतुलित आहार घ्या, नियमित हात स्वच्छ ठेवा व गर्दी टाळा इत्यादी संदेश देण्यात आले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुवर्णा दौंडे, प्रा. मयुर नागपुरे, प्रा. संतोष ढोले, प्रा. अतुल पवार, प्रा. गणेश बुरुगुले, प्राध्यापक व प्राध्यापकेतर सहकारी उपस्थित होते. (२० येवला गणेश)
200921\20nsk_27_20092021_13.jpg
२० येवला गणेश