लघुउद्योग भारतीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:25 IST2018-03-25T00:25:35+5:302018-03-25T00:25:35+5:30

लघुउद्योग भारती नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्ष म्हणून संजय महाजन यांची फेरनिवड करण्यात आली, तर मुख्य सचिवपदी मिलिंद देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.

In the excitement ceremony of Udyog Udyog Bharti | लघुउद्योग भारतीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

लघुउद्योग भारतीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सातपूर : लघुउद्योग भारती नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्ष म्हणून संजय महाजन यांची फेरनिवड करण्यात आली, तर मुख्य सचिवपदी मिलिंद देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. लघुउद्योग भारती नाशिक शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात विद्यमान अध्यक्ष संजय महाजन यांची फेर निवड करण्यात आली, तर मुख्य सचिव मिलिंद देशपांडे, उपाध्यक्ष संजय कपाडिया, नरेंद्र नांदे, सहकार्यवाह अजय लगड, श्रेयस कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद कुलकर्णी, प्रकाश भिडे, राजेंद्र कुलकर्णी, प्रदीप देशपांडे, विनोद पाटील, सिद्धार्थ पाटील, योगेश बहाळकर, मेघराज पवार, अतुल देशमुख, बाळासाहेब गुंजाळ, चैतन्य महाजन, ऋता पंडित, धनलक्ष्मी पटवर्धन यांचा समावेश आहे.  डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट सभागृहात या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अतुल राजोळी, किरण शेलार, लघुउद्योग भारती नाशिक विभाग अध्यक्ष मारुती कुलकर्णी, भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Web Title: In the excitement ceremony of Udyog Udyog Bharti

टॅग्स :Nashikनाशिक