समस्यांच्या निराकरणासाठी आले माजी सैनिक एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:44+5:302021-09-07T04:17:44+5:30

गोंदे दुमाला : तालुक्यातील माजी सैनिक आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी व त्यावर मार्ग काढण्यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष फुलचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ...

Ex-servicemen came together to solve the problems | समस्यांच्या निराकरणासाठी आले माजी सैनिक एकत्र

समस्यांच्या निराकरणासाठी आले माजी सैनिक एकत्र

गोंदे दुमाला : तालुक्यातील माजी सैनिक आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी व त्यावर मार्ग काढण्यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष फुलचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकूर येथे एकत्र आले होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार तसेच कार्याध्यक्ष विजय कातोरे उपस्थित होते.

प्रारंभी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इगतपुरी तालुका माजी सैनिक संघटनेचे सचिव तुकाराम काजळे यांनी संघटनेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. संघटनेचे अध्यक्ष यादव पटेकर यांनी आजी-माजी सैनिकांसाठीच्या शासकीय योजना, अनुदान तसेच माजी सैनिकांच्या अडचणी व संघटना वाढ याविषयी मार्गदर्शन केले. कातोरे यांनी माजी सैनिकांनी संघटन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सैन्यात असताना सुभेदार, मेजर म्हणून कर्तव्य बजावलेल्या सैनिक व अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर वाॅचमन, गार्ड यासारखी नोकरी करावी लागते. हे टाळण्यासाठी नागरी सेवेत माजी सैनिकांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. माजी सैनिकांच्या मुलांचे शैक्षणिक धोरण स्वीकारत त्यांंना शासकीय सुविधांचा लाभ मिळावा तसेच माजी सैनिकांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे असेही कातोरे यांनी सांगितले.

वालदेवी धरणात बुडालेल्या ५ तरुणांना वाचविण्याचे प्रयत्न करणाऱ्या अपघात नियंत्रण अधिकारी हरिश्चंद्र चौबे, कार्याध्यक्ष विजय कातोरे, एस नहाटा, अनिल नाठे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी उपाध्यक्ष शांताराम सचिव भगवान सहाणे, किसन हंबीर, शिवाजी गिरांगे, हरहुन्नरी कप्तान सखाराम पाचरणे, नंदू आंबेकर, किरण वाजे, मनीराम मदगे, बाळासाहेब चव्हाण, विठ्ठल मेंगाळ, किरण वाजे, विठ्ठल मेंगाळ, मनीराम मदगे, बालासाहेब चव्हाण, भगवान सहाणे आदीं उपस्थित होते.

फोटो - ०६साकूर १

साकूर येथील माजी सैनिकांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रदेशाध्यक्ष फुलचंद पाटील. समवेत पळशीकर, पारनेरकर, विजय कातोरे आदी.

060921\06nsk_5_06092021_13.jpg

साकूर येथील माजी सैनिकांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रदेशाध्यक्ष फुलचंद पाटील. समवेत . पळशीकर, पारनेरकर, विजय कातोरे आदी.

Web Title: Ex-servicemen came together to solve the problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.