नाशिक : भारतीय माजी सैनिक संघाच्या वतीने संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत माजी सैनिक तसेच वीरपत्नी आणि वीर माता-पित्यांचा मेळावा येत्या रविवारी (दि. ३०) आयोजित करण्यात आला आहे. पंचवटीतील स्वामी नारायण मंदिराच्या सभागृहात दुपारी तीन वाजता हा मेळावा होणार आहे. यावेळी माजी सैनिकांच्या विविध समस्या, सरकारचे सैनिकांविषयी धोरण, माजी सैनिकांच्या पेन्शनविषयी धोरण अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे.
माजी सैनिकांचा मेळावा
By admin | Updated: April 26, 2017 01:55 IST