शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे ,कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
4
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
5
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
6
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
7
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
8
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
9
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
10
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
11
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
12
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
13
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
14
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
15
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
16
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
18
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
19
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
20
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

मतदारांसाठी इव्हीएमचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 6:35 PM

दिंडोरी येथील तहसील कार्यालयात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्देदिंडोरी तहसील : निवडणूक यंत्राविषयी कार्यशाळा

दिंडोरी : येथील तहसील कार्यालयात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा घेण्यात आली.भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीविषयी कामकाज सुरू आहेत. मागील आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील निवडणुकीसाठी नियुक्ती झाले. १९८९ अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण झाले. तहसील कार्यालयात तहसीलदार बाबासाहेब गाढवे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विनायक थविल यांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांना निवडणूकयंत्र याविषयी प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. याप्रसंगी गाढवे यांनी निवडणूक यंत्राबाबत सविस्तर माहिती देत शंकांचे निरसन केले. या निवडणुकीच्या वेळी मतदाराने आपल्या मतदान केंद्रात मतदान केल्यावर त्यास त्या यंत्रावर सात सेकंद आपण कोणाला मतदान केले याचे चिन्ह स्क्र ीनवर दिसणार आहे व त्यानंतर त्याची स्लिप यंत्रामध्ये साठविली जाणार आहे. मतदार निवडणूक यंत्राचा वापर कसा करायचा, याची माहिती त्यातील प्रशिक्षक एस. आर. गांगुर्डे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली.कार्यशाळेस तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार विनायक थविल, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संतोष कथार, भगवान गायकवाड, किशोर जाधव, सुनील घुमरे, समाधान पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकGovernmentसरकार