मतदारांसाठी इव्हीएमचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:36 IST2019-03-09T18:35:29+5:302019-03-09T18:36:03+5:30
दिंडोरी येथील तहसील कार्यालयात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा घेण्यात आली.

—————————————— दिंडोरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक यंत्राविषयी माहिती देताना तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार विनायक थविल आदी.
दिंडोरी : येथील तहसील कार्यालयात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा घेण्यात आली.
भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीविषयी कामकाज सुरू आहेत. मागील आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील निवडणुकीसाठी नियुक्ती झाले. १९८९ अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण झाले. तहसील कार्यालयात तहसीलदार बाबासाहेब गाढवे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विनायक थविल यांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांना निवडणूकयंत्र याविषयी प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. याप्रसंगी गाढवे यांनी निवडणूक यंत्राबाबत सविस्तर माहिती देत शंकांचे निरसन केले. या निवडणुकीच्या वेळी मतदाराने आपल्या मतदान केंद्रात मतदान केल्यावर त्यास त्या यंत्रावर सात सेकंद आपण कोणाला मतदान केले याचे चिन्ह स्क्र ीनवर दिसणार आहे व त्यानंतर त्याची स्लिप यंत्रामध्ये साठविली जाणार आहे. मतदार निवडणूक यंत्राचा वापर कसा करायचा, याची माहिती त्यातील प्रशिक्षक एस. आर. गांगुर्डे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली.
कार्यशाळेस तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार विनायक थविल, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संतोष कथार, भगवान गायकवाड, किशोर जाधव, सुनील घुमरे, समाधान पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.