नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीनंतर भाजपा सेनेत सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची राळ कायम आहे. ज्या चार सदस्यांचे राजीनामे घेतले नाहीत असा आरोप करण्यात आला हाेता, त्यांचे आपली नवीन महसभेसाठी संमती असल्याचे पत्रच घेऊन गटनेते जगदीश पाटील यांनी ते आयुक्तांना सादर केले तर दुसरीकडे बंद पाकीटात पत्र न पाठवल्याचा मु्द्दा सत्तारूढ पक्षाने उपस्थित केल्याने शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी त्यावर टीका केली असून जर नियमानुसार बंद पाकीटात नाव नव्हते तर महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारलेच का असा प्रश्न केला आहे.स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी बुधवारी (दि.२४) विशेष महासभा पार पडली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी संपूर्ण समितीचीच पुनर्रचना केली. त्यात भाजपाच्या वर्षा भालेराव, हेमंत शेट्टी, राकेश दोंदे आणि सुप्रिया खोडे यांची समितीत मुदत दोन वर्षांची असताना एका वर्षात त्यांना बदलण्यात आले, त्यासाठी त्यांचे राजीनामे रीतसर घेण्याची गरज होती त्याबाबत पूर्तता केली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांंनी चौघांचे पत्र घेऊन तेच प्रशासनाला सादर केले आहे. कायदेशीर सल्लागार ॲड. एम. ए, पाटील यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच समितीची रचना करण्यात आली असून त्यामुळे या नव्या रचनेस कोणतीही हरकत नसल्याचे चौघांनीही लेखी दिल्याचे गटनेते पाटील यांनी सांगितले.
भाजपकडून पुरावे बळकट, सेनेकडून आरोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 01:42 IST
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीनंतर भाजपा सेनेत सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची राळ कायम आहे. ज्या चार सदस्यांचे राजीनामे घेतले नाहीत असा आरोप करण्यात आला हाेता, त्यांचे आपली नवीन महसभेसाठी संमती असल्याचे पत्रच घेऊन गटनेते जगदीश पाटील यांनी ते आयुक्तांना सादर केले तर दुसरीकडे बंद पाकीटात पत्र न पाठवल्याचा मु्द्दा सत्तारूढ पक्षाने उपस्थित केल्याने शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी त्यावर टीका केली असून जर नियमानुसार बंद पाकीटात नाव नव्हते तर महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारलेच का असा प्रश्न केला आहे.
भाजपकडून पुरावे बळकट, सेनेकडून आरोपांच्या फैरी
ठळक मुद्देस्थायी समितीचा वाद : महापौरांच्या कार्यपद्धतीवर घेतली शंका