शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाचे योगदान हवे

By bhagyashree.mule | Updated: February 27, 2018 00:11 IST

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक शाळांना प्रोत्साहन आणि मराठी माध्यमिक शाळांचे खच्चीकरण, शाळा बंद पाडणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामांमध्ये गुंतवणे, मराठी भाषेबद्दल पालकांमध्येच असलेली नकारात्मक वृत्ती, इंग्रजी माध्यमाचा सोस, शासन स्तरावरही मराठी भाषेच्या वाढीबाबत निरुत्साह यामुळे मराठी भाषा मागे पडते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक शाळांना प्रोत्साहन आणि मराठी माध्यमिक शाळांचे खच्चीकरण, शाळा बंद पाडणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामांमध्ये गुंतवणे, मराठी भाषेबद्दल पालकांमध्येच असलेली नकारात्मक वृत्ती, इंग्रजी माध्यमाचा सोस, शासन स्तरावरही मराठी भाषेच्या वाढीबाबत निरुत्साह यामुळे मराठी भाषा मागे पडते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विपुल साहित्याची उपलब्धता, प्रत्यक्ष साहित्यिकांचा, तज्ज्ञांचा सहवास, साधनांची सहजतेने होणारी उपलब्धता, असे असूनही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मराठी भाषा सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेकडे अभिमानाने पहावे, मराठीचा दैनंदिन जीवनात वापर वाढवावा, मराठी साहित्याचे आवडीने वाचन केले जावे, सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये मराठी विषय सक्तीचा करावा, घरातून भाषेचे संस्कार केले जावे, वाचनालयांची संख्या वाढवावी, मराठी शाळांमधून मोफत शिक्षण मिळावे, आणि नुसते वाचता-बोलता आले म्हणजे मराठी भाषा आली हा गैरसमज मनातून काढून टाकून मराठी भाषा शास्त्रशुद्ध पद्धतीने, व्याकरणासह साहित्याच्या सखोल वाचनाने शिकावी लागते, आत्मसात करावी लागते याचा स्वीकार व अंमलबजावणी व्हावी, असे मत ज्येष्ठ कवी, लेखक किशोर पाठक, नरेश महाजन, डॉ. मोहिनी पेठकर, प्रा. लता पवार, प्रा. वेदश्री थिगळे, अभिनेता दिग्दर्शक सचिन पाटील, नथुजी देवरे, पूनम वाघ यांनी ‘लोकमत’च्या विचार- विमर्शच्या व्यासपीठावर व्यक्त केले.मातृभाषा बोलताना कमीपणा वाटायला नको!मराठी भाषा टिकावी, वाढावी यासाठी सरकार खास असे प्रयत्न करताना दिसत नाही. मराठी शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मात्र अनुकूल वातावरण तयार करून दिले जात आहे. मराठी शाळांमध्ये मुलांना बसायला बेंच नाही, बस्कर नाही, प्यायला पाणी नाही, मदतीला शिपाई, क्लर्क नाही, शिक्षकांवर अध्यापनाबरोबरच अशैक्षणिक कामांचा बोजा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मराठी शाळा यांच्यात विरोधाभास दिसतो. विद्यार्थ्यांना सौम्य प्रकारची शिक्षा करायची नाही पण विद्यार्थी अभ्यासात मागे नाही राहिले पाहिजे, अशी अपेक्षा समाजाकडून केली जाते. त्यामुळे सत्य घटनांचे अपवाद वगळता बºयाचशा शाळांमध्ये शिक्षकांना काढून टाकण्यासाठीच त्यांनी केलेल्या शिक्षेचा बाऊ करून प्रकरण वाढवले जाते. अशा परिस्थितीत मराठी शाळा सुरू आहेत. शाळेच्या शिक्षकाला सन्मान मिळाला पाहिजे. समाजाकडून मराठी भाषेला प्रतिष्ठा दिली जात नाही. हिंदी सिनेमात मराठी भाषा बोलणारी बाई कामवाली दाखवली जाते. मराठी भाषा गांभीर्याने अभ्यासली गेली पाहिजे. अवांतर वाचन सक्तीचे केले गेले पाहिजे. तरच मराठी भाषा टिकेल, वाढेल. - प्रा. लता पवार, आरंभ महाविद्यालयमराठीबाबत शहरापेक्षा खेड्यातले चित्र आशादायीशहरी भागापेक्षा खेड्यापाड्यांमध्ये मराठीची स्थिती चांगली, आशादायी असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. शासनाकडूनही मराठी भाषेसाठी चांगले प्रयत्न होत आहे. शासनाच्या भाषा संचालनालयाचे प्रतिनिधी पाहिल्यास त्यात मराठी माध्यमातून आयएएस परीक्षा दिलेल्या नामवंत व्यक्ती दिसून येतील. परदेशातील भारतीय आणि विशेषत: मराठी माणसे मराठी भाषेचे सर्वाधिक जतन करत आहेत. ते घरात आवर्जून मराठी बोलतात. त्यांची मुले शुद्ध मराठीत संवाद साधतात. याउलट भारतात मात्र मराठी मुलांना मराठी नीट वाचताही येत नसल्याचे दिसते आहे. मराठी भाषा असणाºया मुलांना दुसºया भाषेचे आकलन पटकन होते मग मराठी भाषेचे का होत नाही, याचा विचार पालकांनी केला पाहिजे. मराठी भाषा समृद्ध होती, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे मराठी भाषा लोप पावतेय, असा गळा काढण्याची गरज नाही. भाषा ही प्रयोगशील असते. आपण तोच प्रयत्न केला पाहिजे. मराठीचे प्रेम म्हणजे इंग्रजीचा दुस्वास नाही. इंग्रजी ही अनेक देशांशी संपर्क करण्याचा दुवा म्हणून आजवर काम केले पाहिजे. त्यामुळे दुवा इतकेच त्याचे महत्त्व ठेवावे आणि मराठी ही आपली मुख्य भाषा असावी.  - किशोर पाठक, ज्येष्ठ साहित्यिकमराठी भाषा जगवण्याची जबाबदारी प्रत्येकाचीमूल जन्मताच त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शोध सुरू होतो. घरात त्याची चर्चा सुरू होते. पण इंग्रजी माध्यमिक शाळेतील शिक्षण हे मुलांचे करिअर करेल पण मातृभाषेतून दिलेले शिक्षण हे माणसाचे जगणे समृद्ध करते. तो मातृभाषेतून शिकला तर अंतर्बाह्य व्यक्त होऊ शकेल. मराठी भाषेच्या पिछेहाटीस समाज जबाबदार आहे, असे म्हणून आपण मोकळे होतो. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, समाज ही आभासात्मक संकल्पना आहे. समाज करेल हे म्हणणेच चुकीचे आहे. ही सर्व जबाबदारी आपली आहे. आपणच मातृभाषेचा सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे. पोटासाठी करिअर आणि जगण्यासाठी भाषा ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. भाषेच्या संवर्धनासाठी मनापासून कृती करणारी यंत्रणा आपल्या शासनाकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. करिअरसाठी इंग्रजी शिकायला हरकत नाही पण त्याचा मातृभाषेतील साहित्य, नाटक, कविता, कथा यांचाही परिचय करून दिला पाहिजे. मराठी शाळा विकसित झाल्या पाहिजेत.  - नरेश महाजन, ज्येष्ठ साहित्यिकमराठीच्या सद्यस्थितीकडे सकारात्मकतेने बघामराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन एका मर्यादेपर्यंतच काम करू शकते. त्याच्यापुढची मोठी जबाबदारी समाजाची म्हणजेच आपल्या प्रत्येकाची आहे. शासनाकडून मराठी भाषाविषयक धोरण, चर्चासत्र, भिंगारसारख्या गावाची निर्मिती अशा अनेक स्तरावर काम सुरू आहे. त्यातून सकारात्मक वातावरण पहायला मिळते आहे. मराठी भाषेचे संवर्धन हजारो वर्षांपासून संत ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी आदी विविध महान व्यक्तींकडून केले गेले. ती साधना आजही अखंडितपणे सुरू आहे. नागरिक, प्रसारमाध्यमे, शिक्षक, प्राध्यापक, पालक, ज्येष्ठ नागरिक या साºयांनी मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाषेचे संस्कार घरातूनच झाले पाहिजे. मराठीत बोलणे, लिहिणे, ऐकणे, वाचणे या गोष्टी झाल्या पाहिजे. मराठीचा न्यूनगंड फेकून दिला पाहिजे. दोन उच्चशिक्षित मराठी माणसे भेटली की ती इंग्रजीत संवाद सुरू करतात. ते थांबल पाहिजे. सोशल मीडियावरही सध्या मराठीबाबत आशादायी चित्र दिसते आहे. मराठीत चांगले चांगले ब्लॉगही वाचायला मिळत आहे. मराठी भाषेने अवगत केलेले तंत्रज्ञानही कौतुकास्पद आहे. तरुणांकडून हे आशादायी चित्र दिसत आहे. मराठी भाषा दीर्घकाळ टिकणार, यात काही शंकाच नाही.  - डॉ. मोहिनी पेठकर, एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयमराठीचे वाचन वाढले पाहिजेमराठी मातृभाषा असणाºया राज्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण वाढत चालले आणि मराठा शाळा बंद पडत चालल्या आहेत, याचे वाईट वाटते. मराठी शाळा-कॉलेजात शिक्षणाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचबरोबर तेथील शिक्षकांना आर्थिक मोबदलाही कमी दिला जातो. शिक्षक-मुले मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगतात. इंग्रजी माध्यमिक शाळात मराठी विषय असला तरी पुरेशा तासिकाही होत नाही. दर्जाही सांभाळला जात नाही. मराठी भाषेचे ज्ञान अद्ययावत ठेवत नाही. राज्यात ग्रंथालयांची स्थिती खराब आहे. जिथे ग्रंथ आहे तिथे वाचक नाही, जिथे वाचक आहे तिथे ग्रंथ नाही. ग्रंथालयातील वाचक सभासदांचे अवलोकन केल्यास ज्येष्ठ नागरिक, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे प्रमाण सर्वाधिक दिसते. पण शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदारवर्ग, व्यावसायिक, गृहिणी यांनी सध्या ग्रंथालयांकडे पाठ फिरवली आहे, असे दिसते. प्रत्येक अभ्यासक्रमात मराठी भाषा हा विषय सक्तीचा असला पाहिजे. मराठी भाषा वाचवण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन वाढले पाहिजे. वाचनालयांची संख्या वाढली पाहिजे. सोशल मीडियावरचे वाचन आणि प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन केलेले वाचन यात खूप फरक आहे. तो तरुण पिढीने समजावून घेतला घेतला पाहिजे. मराठीत दर्जेदार साहित्य आहे. त्यांचे वाचन झाले पाहिजे. खेड्यापाड्यात वाचनालयांची संख्या आणि पुस्तकांची संख्या वाढली पाहिजे. ती जबाबदारी शहरातील मराठीप्रेमी नागरिकांची आहे.  - नथुजी देवरे, कार्यवाह, पंचवटी सार्वजनिक वाचनालयबालपणापासून मुलांवर व्हावे मराठीचे संस्कारमराठी भाषा मागे पडत चालली आहे, तिच्या संवर्धनासाठी काहीतरी केले पाहिजे अशी वेळ येणे हे मराठी भाषेचे दुर्दैव म्हणावे लागेल आणि ही वेळ आणण्यास आपणच कारणीभूत आहोत, याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मुलगा जन्माला येत नाही तोच त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमिक शाळेचा शोध घेतला जातो. मुलांनाच घरातल्या गोष्टींची ओळख इंग्रजीतून करून दिली जाते. मम्मी, पप्पा, अंकल, आंटी, फिश, स्पून, डॉग असे त्याला शिकवले जाते. मराठी भाषेचा न्यूनगंड वाटायला नको. मराठी भाषेच्या शिक्षकाकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघितले

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018