नाशिकच्या सरावातून एव्हरेस्ट सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:17 IST2019-07-20T23:12:06+5:302019-07-21T00:17:45+5:30
मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते थेट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नाशिकच्या पांडवलेणी आणि अंजनेरी पर्वतावर नियमित सराव केल्याचे सांगत या सरावातूनच एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे डॉ. महेंद्र महाजन यांनी ‘सी टू स्काय’ या सायकलिंग, ट्रेकिंग व माउंटिंग मोहिमेचे अनुभव कथन करताना सांगितले.

नाशिकच्या सरावातून एव्हरेस्ट सर
नाशिक : मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते थेट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नाशिकच्या पांडवलेणी आणि अंजनेरी पर्वतावर नियमित सराव केल्याचे सांगत या सरावातूनच एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे डॉ. महेंद्र महाजन यांनी ‘सी टू स्काय’ या सायकलिंग, ट्रेकिंग व माउंटिंग मोहिमेचे अनुभव कथन करताना सांगितले.
रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात डॉ. महाजन बंधूंच्या ‘मीशन सी टू स्काय’ या साहसी मोहिमेतील सायकलिंग आणि गिर्यारोहणाच्या ‘अनुभव कथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष अॅड. मिलिंद चिंधडे, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. राजेंद्र नेहेते आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. महाजन यांनी मोहिमेच्या मार्गावर १६ ते १७ ठिकाणी हृदयविकार झटक्याच्या प्रसंगी प्राथमिक उपचार म्हणून उपयुक्त असलेल्या जीवन संजीवनी तंत्राविषयी जनजागृती करताना आलेल्या अनुभवही सांगितले. दरम्यान, रोटरी क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत नाशिकहून परदेशात जाण्याची संधी मिळालेल्या तेजल दीक्षित व ऋषिकेश पटवर्धन यांच्यासह तैवानमधून नाशिकला आलेल्या विल्यमचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रंचालन शेखर ब्राह्मणक र यांनी केले. डॉ. श्रेया कुलकर्णी यांनी आभार मानले.