अखेर अत्री शाळेला एक वर्गखोली मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 00:46 IST2016-01-16T00:46:05+5:302016-01-16T00:46:05+5:30
अत्री जिल्हा परिषद शाळेची इमारत निर्लेखित करण्याचा ठराव व अहवाल आहे. मात्र, इमारतीअभावी येथील विद्यार्थ्यांना जीर्ण इमारतीतच बसून विद्यार्जन करावे लागत होते.

अखेर अत्री शाळेला एक वर्गखोली मंजूर
नाशिक : दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर येऊन पाहणी करून गेलेल्या शिवसेनेच्या मंत्री-आमदारांच्या समितीने केलेल्या सूचनांना शासकीय यंत्रणेने केराची टोपली दाखविली असून, महिना उलटला तरी एकाही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही, परिणामी समितीचा दौरा निव्वळ फार्सच होता, अशी टीका आता होऊ लागली आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बारा आमदारांच्या समितीने दुष्काळसदृश परिस्थिती जाणून घेतले होते. या दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे संयुक्त बैठकीत आमदारांनी त्यांचे अनुभव कथन करताना प्रश्न उपस्थित केले. त्यावर यंत्रणेने दखल घेऊन समस्या सोडविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. विशेष म्हणजे याची सारी जबाबदारी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.