पेठ परिसरात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:22 IST2020-08-16T22:07:54+5:302020-08-17T00:22:44+5:30
पेठ : तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.

पेठ येथील तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करताना तहसीलदार संदीप भोसले समवेत लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पदाधिकारी.
पेठ : तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, कमर्चारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
पंचायत समिती, नगरपंचायत, हुतात्मा स्मारक, पोलीस ठाणे, वनविभाग, डॉ. विजय बीडकर विद्यालय, दादासाहेब बीडकर महाविद्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जि.प. शाळा पेठ नं. १ व २, राष्टÑीयीकृत बँक, जिल्हा बँक, सार्वजनिक वाचनालय यासह विविध शासकीय कार्यालर्यंत ध्वजारोहण संपन्न झाले.
पेठ नगरपंचायतीच्या वतीने कोविड काळात विविध विभागात काम करणाऱ्या कोविडयोध्दा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य, सफाई, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी विभागातील कर्मचाºयांनी सेवा बजावल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, मुख्याधिकारी कृष्णकांत कहार, गटनेते भागवत पाटील, प्रशासन अधिकारी चंद्रकांत भोये यांचे सह नगरसेवक, अधिकारी, कमर्चारी, नागरिक उपस्थित होते.