शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:07 PM

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.

ठळक मुद्देप्रकाश पर्व : भजन, कीर्तनासह विविध धार्मिक उपक्रम

इंदिरानगर : शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.शहरातील गुरूनानक देवजी सेवा असोसिएशनद्वारा साजऱ्या करण्यात येत असलेल्या ५५०व्या गुरूनानक जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय विशेष प्रकाश पर्वानिमित्त शीख कीर्तन जत्थाचे मुख्य कीर्तनकार भाई अमनदीप सिंघजी, भाई बलप्रित सिंघजी आणि भाई सीम्रनजीत सिंघजी यांनी आपल्या विशेष कीर्तनांद्वारे गुरूनानक देवजी यांच्या विचारांबद्दल आपल्या ओघवत्या वाणीद्वारे मार्गदर्शन केले. या सर्व कीर्तनांचा मतितार्थ असा होता की, गुरु नानक देवजी यांची शिकवण म्हणजे घराच्या दरवाज्यावर लावलेला दिवा आहे, जो घराच्या आत ही प्रकाश देतो आणि घराच्या बाहेरही प्रकाश देतो. मानवाचे अंतर्मनही अंतर्बाह्य प्रकाशमान करण्यासाठी त्यांची शिकवण आजही हरप्रकारे आपल्याला मार्गदर्शक आहे. सर्व शक्य मार्गांनी त्यांची सेवा करा. अशाने सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मिती होईल जी सर्व समाजाला तसेच देशाला स्वस्थ ठेवेल, असे यावेळी कीर्तनात सांगण्यात आले. या प्रकाश पर्व सोहोळ्यामध्ये आमदार सीमा हिरे, स्कूल आॅफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल सलारिया, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, वाघ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी समीर वाघ यांनीदेखील विशेष उपस्थिती लावली. यावेळी गुरुगोबिंद सिंघ फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेव सिंघ बिर्दी, सचिव बलबीर सिंघ छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परिमंदर सिंग तसेच गुरुनानक देवजी सेवा असोसिएशनच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी तसेच शहरातील शीख बांधव, उपस्थित होते.मनुष्याने नेहमी सत्कर्म करावेयावेळी कीर्तनात सांगण्यात आले की, राष्ट्रीय एकात्मतेला पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत रहा, मनुष्याने मनुष्याशी मनुष्यासारखे वागले पाहिजे. जात, पंथ, धार्मिक मतभेद दूर करण्यासाठीच गुरूनानकजी यांनी लंगरची प्रथा सुरू केली. जिथे कोणताही भेदभाव न होता सर्वजण एका पंगतीत बसून अन्नग्रहण करतात. गुरूची शिकवण मनुष्याला नेहमीच सर्वांगीण विकासाला पोषक ठरते असे मार्गदर्शन या कथा कीर्तनाद्वारे लाभले.

टॅग्स :NashikनाशिकsikhशीखReligious programmeधार्मिक कार्यक्रम