आजही पाण्यातच भरला बुधवारचा बाजारं

By Admin | Updated: August 7, 2014 01:40 IST2014-08-07T01:33:39+5:302014-08-07T01:40:58+5:30

आजही पाण्यातच भरला बुधवारचा बाजारं

Even today, there are water-filled markets in the market | आजही पाण्यातच भरला बुधवारचा बाजारं

आजही पाण्यातच भरला बुधवारचा बाजारं

  गेल्या पंधरवड्यापासून शहरात सुरूअसलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन धरणातून पाणी सोडले जात आहे. यामुळे मात्र गोदाघाटावर भरणाऱ्या बुधवारच्या बाजाराला मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून बुधवारचा बाजार नेहमीप्रमाणे भरलाच नाही. आजही गुडघ्याइतक्या पाण्यात व्यावसायिकांना आपली दुकाने थाटावी लागली. तसेच ग्राहकांनाही गुडघाभर पाण्यातूनच मार्गक्रमण करीत खरेदी करावी लागली. अनेक व्यावसायिकांनी आपल्या चारचाकी वाहनांच्या आधारे दुकान थाटल्याचे दिसून आले. पाण्यामुळे मालाचेही मोठे नुकसान झाले. आजचाही बाजार अर्धवट भरला असला, तरी ग्राहकांनी मात्र बऱ्यापैकी गर्दी केली होती.

Web Title: Even today, there are water-filled markets in the market