शिवशाही बसेसही सुसाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:35+5:302021-09-06T04:18:35+5:30
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेची चाके आता बऱ्यापैकी रूळावर आलेली आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास महामंडळाला काही ...

शिवशाही बसेसही सुसाट!
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेची चाके आता बऱ्यापैकी रूळावर आलेली आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास महामंडळाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विशेषत: शिवशाही बसेसला वाढता प्रतिसाद महामंडळाच्या उत्पन्नाला हातभार लावणारा ठरत आहे अर्थात सर्वच मार्गावरील बसेसेला प्रतिसाद मिळत नसला तरी पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या शिवशाही सुसाट सुरू असल्याचे दिसते.
टप्प्या-टप्प्याने सुरू झालेल्या प्रवासी बसेसचा परिणाम दिसून येत आहे. ग्रामीण भागातील बसेस सुरू झाल्यामुळे अधिकच चालना मिळाली आहे. लांबपल्ल्याच्या बसेसलादेखील चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे बसेसकडे प्रवाशांचा कल असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. रक्षाबंधनापासून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात झाली. आता गणेशोत्सवासाठी देखील बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे धिम्या गतीने होणारी प्रवासी वाहतूक आता सुसाट सुरू झाल्याचे म्हणता येईल.
--इन्फो--
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही बसेस
नाशिक-पुणे
नाशिक-मुंबई
नाशिक्-बोरिवली
नाशिक-दादर
नाशिक-औरंगाबाद
--इन्फो--
जिल्ह्यातील एकूण आगार-१३
सुरू असलेल्या शिवााही:३७
एकूण शिवशाही : ५३
--इन्फो--
बसेसचे दररोज सॅनिटाझेशन
प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी डेपोसून निघालेल्या बसेसच रोजच सॅनिटायझेशन केले जाते असे महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. नाशिकहून निघणाऱ्या शिवशाही आणि पुणे, मुंबई तसेच अन्य ठिकाणांहून नाशिकला येणाऱ्या शिवशाही या सर्व सॅनिटाईझ केल्या जातात. परिवहन महामंडळाकडून याबाबतचे आदेश प्रत्येक आगाराला देण्यात आलेले आहे. राज्यातील काही आगारांमध्ये तर खासगी संस्थांमार्फत सॅनिटायझेशन केले जात आहे.
--इन्फो--
सर्वच मार्गांवर मिळतोय प्रतिसाद
शिवशाही बसेसेला सर्वच मार्गांवर प्रतिसाद मिळू लागला आहे. काेरोनानंतर शिवशाही बसेस सुरू झाल्या तेव्हा प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता; परंतु आता कोरोनाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे प्रवााशांकडून शिवशाही बसेसला पसंती दिली जात असल्याचे गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसून येत आहे. शिवशाही बसेसच्या रोजच्या गाड्यांमध्ये दोन तीनने वाढ किंवा घट होतच असते. मात्र, प्रवासी संख्या टिकून आहे.
050921\05nsk_31_05092021_13.jpg
शिवशाही बस डमी