शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातही बहरले मका पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:56 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कांदा रोपे मिळत नसल्याने रब्बी हंगामातही मका पीक घेतले व ते ...

ठळक मुद्देचाऱ्याला मागणी : भरघोस उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कांदा रोपे मिळत नसल्याने रब्बी हंगामातही मका पीक घेतले व ते बहरले आहे. यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने इतर पिकांबरोबर उन्हाळी मका क्षेत्रात वाढ झाल्याने जनावरांसाठी चाºयाची मागणी वाढली आहे.अनेक वर्षांपासून शेतकरी खरीप मक्याचे पीक घेत होते, पण ही कांदा रोपे सडून गेल्याने शेतकºयांनी उन्हाळी मका पिकाचा प्रयोग करून पाहिला. सुरुवातीला लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता, पण आता पीक बहरले असून, पाण्याची पूर्तता झाल्यास भरघोस उत्पादन मिळण्याची आशा शेतकºयांना आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा पिकाबरोबर आता मका पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याने शेतकºयांना उन्हाळी मका पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पूर्वी शेतकरी खरिपातील मका पीक घेतल्यानंतर रब्बीतील उन्हाळी मका घेत नव्हते, पण आता रब्बीतही मका पीक चांगल्याप्रकारे येत असल्याने मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी खरिपातील मक्याला लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांना उत्पादनात घट येऊन औषधांचा खर्च वाढला होता. आता शेतकºयांनी रब्बीतही उन्हाळी मका घेण्याचा पर्याय शोधल्याने शेतकºयांना, जनावरांना चाराही उपलब्ध होऊन मक्याचेही उत्पादन मिळणार आहे.पाण्याची कमतरता भासल्यास मुरघास तयार करून ठेवल्यास कित्येक दिवस हिरवा चारा म्हणून उपयोग होणार आहे.यावर्षी रब्बी हंगामात मका पीक घेऊन पाहिले. औषधे फवारणी करून पीक चांगले आले असून, दोन एकर मका पेरलेला आहे. सध्या जनावरांच्या चाºयासाठी मागणी असल्याने १५०० रु पये गुंठ्याप्रमाणे शेतकरी मुरघासासाठी घेत आहेत.- शांताराम मढवई, मका उत्पादक, पिंपळगाव लेप

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती