रब्बी हंगामातही बहरले मका पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:56 IST2020-02-12T22:02:31+5:302020-02-12T23:56:32+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कांदा रोपे मिळत नसल्याने रब्बी हंगामातही मका पीक घेतले व ते ...

नेऊरगाव येथील अंकुश गायकवाड यांनी घेतलेले मका पीक.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कांदा रोपे मिळत नसल्याने रब्बी हंगामातही मका पीक घेतले व ते बहरले आहे. यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने इतर पिकांबरोबर उन्हाळी मका क्षेत्रात वाढ झाल्याने जनावरांसाठी चाºयाची मागणी वाढली आहे.
अनेक वर्षांपासून शेतकरी खरीप मक्याचे पीक घेत होते, पण ही कांदा रोपे सडून गेल्याने शेतकºयांनी उन्हाळी मका पिकाचा प्रयोग करून पाहिला. सुरुवातीला लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता, पण आता पीक बहरले असून, पाण्याची पूर्तता झाल्यास भरघोस उत्पादन मिळण्याची आशा शेतकºयांना आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा पिकाबरोबर आता मका पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याने शेतकºयांना उन्हाळी मका पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पूर्वी शेतकरी खरिपातील मका पीक घेतल्यानंतर रब्बीतील उन्हाळी मका घेत नव्हते, पण आता रब्बीतही मका पीक चांगल्याप्रकारे येत असल्याने मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी खरिपातील मक्याला लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांना उत्पादनात घट येऊन औषधांचा खर्च वाढला होता. आता शेतकºयांनी रब्बीतही उन्हाळी मका घेण्याचा पर्याय शोधल्याने शेतकºयांना, जनावरांना चाराही उपलब्ध होऊन मक्याचेही उत्पादन मिळणार आहे.
पाण्याची कमतरता भासल्यास मुरघास तयार करून ठेवल्यास कित्येक दिवस हिरवा चारा म्हणून उपयोग होणार आहे.
यावर्षी रब्बी हंगामात मका पीक घेऊन पाहिले. औषधे फवारणी करून पीक चांगले आले असून, दोन एकर मका पेरलेला आहे. सध्या जनावरांच्या चाºयासाठी मागणी असल्याने १५०० रु पये गुंठ्याप्रमाणे शेतकरी मुरघासासाठी घेत आहेत.
- शांताराम मढवई, मका उत्पादक, पिंपळगाव लेप