शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बाइक रॅलीतून स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:24 IST

जागतिक महिला दिनानिमित्त ‘वॉव : वुमन आॅफ विस्डम’ फाउंडेशनतर्फे  शनिवारी बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी दुचाकी वेगवेगळ्या पद्धतीने सजवित हेल्मेटसह  विविध क्षेत्रांत लौकिक मिळविलेल्या आदर्श महिलांचा वेश परिधान करीत नारीशक्तीला सलाम करण्यात आला, तर काहींनी लष्करी गणवेशातील. फुलपाखरांचा व प्रोफेशनल्स रायडिंगचे पोषाख परिधान करीत रॅलीत सहभाग घेतला.  

ठळक मुद्देनाशिकममध्ये महिला शक्तीला सलामबाईक रॅली काढून महिला सबलीकरणाचा संदेश दोनशेहून अधिक महिला रायडर्सचा सहाभाग

नाशिक : नऊवारी  साडी, फेटा, नथ, हातात पाटल्या, बाजूबंद, कमरेला छल्ला अशा पारंपरिक वेशभूषेसह मोपेड, इलेक्ट्रिक बाइक आणि स्पोर्ट बाइक्ससह रस्त्यावरून चालताना लक्षवेधून घेणाऱ्या बुलेटवर स्वार होत नाशिक कर महिलांनीमहिला दिनाचे औचित्य साधून शहरातून एक दिवस आधी ‘जल्लोषात बाइक रॅली’ काढून स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. जागतिक महिला दिनानिमित्त ‘वॉव : वुमन आॅफ विस्डम’ फाउंडेशनतर्फे  शनिवारी (दि.७) बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांनी त्यांच्या दुचाकी वेगवेगळ्या पद्धतीने सजवित हेल्मेटसह  विविध क्षेत्रांत लौकिक मिळविलेल्या आदर्श महिलांचा वेश परिधान करीत नारीशक्तीला सलाम करण्यात आला, तर काहींनी लष्करी गणवेशातील. फुलपाखरांचा व प्रोफेशनल्स रायडिंगचे पोषाख परिधान करीत रॅलीत सहभाग घेतला.  पोलीस आयुक्तविश्वास नांगरे-पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, मानवता कॅन्सर सेंटरच्या डॉ. श्रुती काटे, वॉव फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अश्विनी न्याहारकर, रेखा देवरे, विद्या मुळाने, नीलिमा चुंभळे, उज्ज्वला बोधले, सपना बुटे, शिल्पा दरगोडे आदींनी ठक्कर डोम येथून रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी पौर्णिमा चौगुले-श्रींगी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, ज्योती ठक्कर आदींची उपस्थिती होती. ‘वाहन चालवितांना मोबाइलचा वापर टाळा’, महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान’, ‘हॅपी टू ब्लीड’, ‘सासू सून मित्र, सारे घर तृप्त’, असे संदेश देत महिलांनी ठक्कर डोमपासून जेहान सर्कल, जुना गंगापूर नाका, मॉडेल कॉलनी, समर्थनगर, महात्मानगरकडून ठक्कर डोम, अशी रॅलीमार्गावर जनजागृती केली. निर्भया पोलिसांचे पथक आणि नाशिक सायकलिस्टने रॅलीचे नेतृत्व केले. दरम्यान, केतकी कोकीळ यांनी महिलांना सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले.  

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलPoliceपोलिस