तळवाडेत जातीय सलोखा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:37 IST2018-12-21T00:37:16+5:302018-12-21T00:37:36+5:30

गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करुन त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. ग्रामस्थांनी गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवावा, असे आवाहन वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी तळवाडे दुंधे येथे केले.

Ethnic reconciliation meeting in Talwade | तळवाडेत जातीय सलोखा बैठक

तळवाडेत जातीय सलोखा बैठक

तळवाडे दुंधे : गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करुन त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. ग्रामस्थांनी गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवावा, असे आवाहन वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी तळवाडे दुंधे येथे केले. सायंकाळी तळवाडे येथे शांतता व जातीय सलोखा समितीच्या बैठकीत राऊत बोलत होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीणचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, जमादार पाटील, जावेद शेख, देवराम पवार यांचीही भाषणे झाली. तळवाडे गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.

Web Title: Ethnic reconciliation meeting in Talwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.