शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

शहरात आचारसंहितेची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:49 IST

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे फलक लगोलग हटविले.

नाशिक : विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे फलक लगोलग हटविले. मात्र शहरातील वेगवेगळ्या शासकीय इमारती आणि सार्वजनिक संस्थांच्या उद्घाटन आणि उपक्रमांच्या कोनशिला ‘जैसे थे’ आहे. ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांची चिन्हे आणि झेंडे अजूनही झळक त असल्याने आदर्श आचारसंहितेची ऐशी तैशी सुरू असून, प्रशासनाकडूनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीला ढील दिली असल्याचे दिसून येत आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी (दि.२१) दुपारपासून लागू झाल्यानंतर नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शासकीय जाहिराती आणि फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. परंतु, निवडणूक विभागाने शहरातील दर्शनी भागाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी साधा दृष्टिक्षेपही टाकला नाही. त्यामुळे शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अंधत्व निवारण नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया विभागाच्या इमारतीवरील कोनशिला, महापालिका नगरसेवकाचे नामोल्लेख असलेल्या पाट्या, खासदारांच्या संपर्क कार्यालयाचे फलक, त्र्यंबकरोडवरील तरणतलाव सिग्नल परिसरांतील झेंडे व पक्षचिन्ह, असे अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने हे फलक काढण्याविषयी किंवा ते झाकण्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यात शनिवारी (दि.२१) विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील विविध राजकीय पक्षांचे फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. पंरतु काही फलक अद्याप कायम असल्याने किती दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.असून, शहरातील विविध ठिकाणी अजूनही वेगवेगळ्या पक्ष व संघटनांचे चिन्ह असलेले फलक खुलेआम झळकत असल्याने आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसत आहेत.निवडणुकीच्या तोंडावर भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर फलक लावले होते. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे पक्षाचे झेंडे चौकाचौकांत लागले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला समारोप सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांनी शहरात फलकबाजी केली होती. यातील दर्शनी भागातील फलक प्रशासनाने काढले असले तरी काही ठिकाणचे झेंडे अद्यापही कायम आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय