इथेनॉल प्रकल्पामुळे साखर उद्योग सावरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:01+5:302021-07-09T04:11:01+5:30
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कादवा सहकारी साखर कारखान्यास भेट देत इथेनॉल प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते ...

इथेनॉल प्रकल्पामुळे साखर उद्योग सावरेल
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कादवा सहकारी साखर कारखान्यास भेट देत इथेनॉल प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी चेअरमन श्रीराम शेटे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, विक्रीकर आयुक्त सुमेरसिंह काले, लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांचे स्वागत करत कारखान्याची वाटचाल विशद केली. गायकवाड यांनी सांगितले, कादवाचे सभासद इथेनॉल प्रकल्पासाठी ठेवी देत आहेत, ही आनंदाची बाब आहे. शेतकऱ्यांनाही अधिक व्याज मिळत आहे. शासनाने अध्यादेश काढत शेअर्सची रक्कम पाच हजाराने वाढवली असून ती रक्कम इतर कारखान्यांनी जमा करण्यास सुरुवात केली आहे. ती कादवानेही सुरू करावी. साखर निर्मिती कमी करणे ही काळाची गरज असून त्यासाठी इथेनॉलसोबत विविध बायो प्रॉडक्टची निर्मिती होणे गरजेचे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन उत्तम बाबा भालेराव, संचालक मधुकर गटकळ,त् र्यंबक संधान, शहाजी सोमवंशी, बाळासाहेब जाधव, दिनकरराव जाधव, बापूराव पडोळ आदी उपस्थित होते.
इन्फो
बायो सीएनजी प्रकल्पाची सूचना
गायकवाड यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत विविध सूचना केल्या.
याप्रसंगी सभासद द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुरेश मामा कळमकर, विलास पाटील, तज्ज्ञ संचालक संपत कोंड यांनी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पासाठी ठेवींचा धनादेश आयुक्त गायकवाड यांच्या हस्ते सुपुर्द केला. यावेळी साखर आयुक्त गायकवाड यांच्या हस्ते इथेनॉल प्रकल्प आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आज पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढत असल्याने इथेनॉलची गरज वाढणार असून थेट इथेनॉलवर चालणारे ट्रॅक्टर व इतर वाहन बनविण्यात येत आहे. या इथेनॉल प्रकल्पातच बायो सीएनजी प्रकल्प सुरू करणे शक्य आहे. कादवाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.
फोटो- ०८ कादवा गायकवाड
कादवा कारखान्याला भेट दिली त्याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड, अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्यासह संचालक मंडळ.
080721\08nsk_43_08072021_13.jpg
फोटो- ०८ कादवा गायकवाड कादवा कारखान्याला भेट दिली त्याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड, अध्यक्ष श्रीराम शेटे यांचेसह संचालक मंडळ.