श्री निलमणी गणेश मंदिरात मूर्तीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:10 IST2020-08-22T18:10:01+5:302020-08-22T18:10:01+5:30
मनमाड : शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणी गणेश मंदिरात पार्थिव मूर्तीची स्थापना साध्या पद्धतीने करण्यात आली. यंदा स्थापना व विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मिरवणूक न काढतापुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात सचिन व्यवहारे यांच्या हस्ते विधिवत स्थापना करण्यात आली.

श्री निलमणी गणेश मंदिरात मूर्तीची स्थापना
ठळक मुद्दे मूर्तीची स्थापना साध्या पद्धतीने करण्यात आली.
मनमाड : शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणी गणेश मंदिरात पार्थिव मूर्तीची स्थापना साध्या पद्धतीने करण्यात आली. यंदा स्थापना व विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मिरवणूक न काढतापुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात सचिन व्यवहारे यांच्या हस्ते विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त नितीन पांडे, शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, किशोर गुजराथी, सूर्यभान वडक्ते, रोहित कुलकर्णी, सचिन वडक्ते, भरत छाबडा, रामदास इप्पर, अक्षय सानप, नीलकंठ त्रिभुवन सौरभ मुणोत, अथर्व गुजराथी, मनोज छाबडा, क्र ांती आव्हाड आदी उपस्थित होते.
(फोटो : 22मनमाड2)