Establishment of Control Room for Freight Vehicles in Nashik | नाशिकमध्ये मालवाहू वाहनांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

नाशिकमध्ये मालवाहू वाहनांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

ठळक मुद्देजीवनावश्यक मालवाहू वाहतूकीचे नियोजन नाशिकमध्ये वाहनांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

नाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून सर्वप्रकारची वाहतूक मर्यादित अथवा बंद करण्याची घोषणा करीत लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. 
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनामार्फत कठोर उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे, सर्व खासगी वाहने यांची अद्ययावत माहिती तयार करणे, तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी वापरण्यात येणाºया सर्व मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतूक करता यावी म्हणून विशेष परवाना प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश केलेले आहेत. अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक/उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथून देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. असे प्रमाणपत्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधातून वगळण्यात आलेल्या बाबींची वाहतूक करणाऱ्यां मालवाहू वाहनांना देणेबाबत आदेशित करण्यात आले असून, शासनाच्या २३ मार्चच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे नाशिक यांच्या नियंत्रणाखाली, नियंत्रण कक्षाची स्थापना व मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाºयांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. 

Web Title: Establishment of Control Room for Freight Vehicles in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.