नांदूरवैद्यला १४ बचतगटांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:58 IST2018-09-07T23:25:51+5:302018-09-08T00:58:02+5:30
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांंतर्गत १४ स्वयं सहायता बचतगटांची स्थापना इगतपुरी पंचायत समितीचे अधिकारी व सरपंच दिलीप मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भैरवनाथ मंदिरात झालेल्या महिला बचतगटाच्या मेळाव्याप्रसंगी करण्यात आली .

नांदूरवैद्यला १४ बचतगटांची स्थापना
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांंतर्गत १४ स्वयं सहायता बचतगटांची स्थापना इगतपुरी पंचायत समितीचे अधिकारी व सरपंच दिलीप मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भैरवनाथ मंदिरात झालेल्या महिला बचतगटाच्या मेळाव्याप्रसंगी करण्यात आली .
गावातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी या उपक्र माची सुरवात करण्यात आली. या गटांची स्थापना करून याविषयी सुनंदा गडकरी, लक्ष्मी गोलाकार, पुष्पलता डोंगरे, कमल गावीत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इगतपुरी पंचायत समितीचे बी.एम.अडसुरे, दीपाली वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदुरवैद्य ग्रामपंचायतीच्या वतीने रोहिदास सायखेडे, गणेश मुसळे, मारु ती डोळस, व महिला वर्गाच्या वतीने उपस्थित अधिकारी वर्गाचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दिलीप मुसळे, अंगणवाडी सेविका सुमन मुसळे यांच्यासह महिला उपास्थित होत्या.
फोटो -
(फोटो ०७ नांदुर)