नाशिक : अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या कल्पना युथ फाउंडेशन संस्थेमार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचे तसेच ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिडिओ मेकिंग स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. यात पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचा दोन ते तीन मिनिटांचे व्हिडिओ शूटिंग करून संस्थेला पाठविण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तसेच शनिवारी (दि.५) सकाळी नाशिक येथील गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि पर्यावरण प्रेमी देवांग जानी यांचा गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी दिलेला लढा यावर वेबिनार आयोजित केला आहे. तर सायंकाळी पर्यावरण विज्ञान आणि त्या संबंधित करिअर या विषयावर विविध तज्ज्ञ वेबीनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जयदीप शाह, उपाध्यक्ष भुषण उगले, सुशांत राजोळे, पवन कदम, हेमंत आढाव, धनंजय लाखे, दीपक तरवडे, विजय वैशंपायन, केतकी जकातदार, साक्षी परदेशी, हंसिका पंडित यांनी केले आहे.
पर्यावरण दिनानिमित्त व्हिडिओ मेकिंग स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST