गुरूनानक प्रकाश पर्वा निमित्त पर्यावरण जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:30 IST2019-08-03T22:28:37+5:302019-08-03T22:30:40+5:30
मनमाड : गुरु नानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड येथे गुरुव्दारा प्रबंधक संत बाबा रणजीत सिंग यांच्या मागदर्शनाखाली धार्मिक कार्यक्र माबरोबर पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.

मनमाड गुरुद्वारामध्ये आयोजित कार्यक्र म प्रसंगी बाबा रणजीत सिंग, जगन्नाथ धात्रक, संतोष बळीद, मयूर बोरसे, कुटे, संजय कटारिया आदी.
मनमाड : गुरु नानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड येथे गुरुव्दारा प्रबंधक संत बाबा रणजीत सिंग यांच्या मागदर्शनाखाली धार्मिक कार्यक्र माबरोबर पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.
महामार्गावरील लासलगाव चादंवड चौफुली येथे गुरुद्वाराच्या वतीने बांधलेल्या स्वागत कमानी उभारण्यात आले आहे. तसेच सर्व प्रथम वृक्षरोपणाचा उपक्र म राबविण्यात आला. पर्यावरण जनजागृतीसाठी शीख बांधवांकडून पुढाकार घेण्यात आला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, सुहास कांदे, संतोष बळीद, गणेश धात्रक, अल्ताफ खान, मंगलसिंग कटारीया, मयुर बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी गुरुद्वाराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीतसिंग यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी स्वराज देशमुख, रविंद इप्पर, गुरूजीतसिंग, विनय आहेर, कैलास गवळी, सिधु छाजेड, अजिक्य साळी, जगजीत कटारीया आदी उपस्थित होते.
(फोटो ०३ मनमाड) मनमाड गुरुद्वारामध्ये आयोजित कार्यक्र म प्रसंगी बाबा रणजीत सिंग, जगन्नाथ धात्रक, संतोष बळीद, मयूर बोरसे, कुटे, संजय कटारिया आदी.