शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:42 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरुपी सवेत सामावून घ्यावे, तसेच समान कामास समान वेतन द्यावे या मागण्यांसह ह्यलॉँग मार्चह्ण काढण्यासाठी एकवटलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेत फूट पडली आहे. सरकारने समायोजनाच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगत एका गटाने आंदोलनात माघार घेतली असून दुसऱ्या गटाने लाँग मार्च करण्यास प्रशासानाने परवानगी नाकारल्याचे कारण देत ह्यलाँग मार्चह्णऐवजी मुंबईतील आझाद उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांच्या लॉँग मार्चला स्थगिती एका गटाची माघार, दुसरा गट मुंबईत करणार आंदोलन सोमवारपासून प्रलंबीत मागण्यासाठी आझाद मैदानावर उपोषण

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरुपी सवेत सामावून घ्यावे, तसेच समान कामास समान वेतन द्यावे या मागण्यांसह ह्यलॉँग मार्चह्ण काढण्यासाठी एकवटलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेत फूट पडली आहे. सरकारने समायोजनाच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगत एका गटाने आंदोलनात माघार घेतली असून दुसऱ्या गटाने लाँग मार्च करण्यास प्रशासानाने परवानगी नाकारल्याचे कारण देत ह्यलाँग मार्चह्णऐवजी मुंबईतील आझाद उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला आहे.नाशिकमधून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्यासाठी नाशिकमध्ये एकवटलेले हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचारी शनिवारी(दि.१९)पुन्हा माघारी परतले असून काही कर्मचारी रेल्वे, बसेस अशा विविध मार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेने शुक्रवारी लॉँग मार्च काढण्याचे नियोजन केले होते. परंतु पोलीस प्रशासानाने मार्च काढण्यास परवानगी नाकारल्याने कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री आणि सचिवांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले. या चर्चेत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एका गटाने लाँग मार्च न करता आंदोनलन मागे घेण्याचे जाहीर करीत माघारी जाण्याची भूमिका घेतली. तर दुसऱ्या गटाने कोणतेही लेखी आश्वासन सरकाने दिलेले नसल्याचे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी महासंघात मतभेद निर्माण होऊन काही आंदोलकांनी गोल्फक्लब मैदान गाठले तर काहींनी माघार घेऊन परतीचा मार्ग स्विकारला. त्यामुळे आंदोलनात फूट पडून आंदोलकांच्या संख्येत झालेली असताना दुसऱ्या गटानेही लाँग मार्च काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सांगत लाँग मार्च करण्याचा विचार मागे ठेऊन मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी लॉँगमार्चचा इशारा दिल्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी संघटनेचे पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केलेली आहे. या संदर्भात संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हर्षल रणावरे यांनी दिली आहे.

 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकHealthआरोग्य