अंगणवाडीसाठीही प्रवेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:28 IST2019-06-14T01:27:29+5:302019-06-14T01:28:45+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर दि. ११ ते ३० जून या कालावधीत अंगणवाडीतही प्रवेशोत्सव सादर करण्यात येणार आहे.

Entrance to the anganwadi | अंगणवाडीसाठीही प्रवेशोत्सव

अंगणवाडीसाठीही प्रवेशोत्सव

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येशाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर दि. ११ ते ३० जून या कालावधीत अंगणवाडीतही प्रवेशोत्सव सादर करण्यात येणार आहे.
१७ जूनपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात होत असून, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत आहे. शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव राबविण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन याबाबत विविध सूचना केल्या.

Web Title: Entrance to the anganwadi