स्वाक्षरीचे जग पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 09:51 PM2020-09-06T21:51:33+5:302020-09-07T00:32:17+5:30

नाशिक : विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या स्वाक्षरीचा संग्रह असलेल्या ‘स्वाक्षरीचे जग’ या मिलिंद चिंधडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. स्वाक्षरींच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

Enthusiastic publication of the book Signature World | स्वाक्षरीचे जग पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन

स्वाक्षरीचे जग या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी रमाकांत तांबोळी, सुधाकर साळी, जयवंतराव तांबोळी, लेखक अ‍ॅड. मिलिंद चिंधडे, प्रसाद देशपांडे, रमेश पडवळ, दीपक पाठक आदी.

Next
ठळक मुद्दे या पुस्तकामुळे अनेकांना स्वाक्षरी मागे दडलेले जग कळेल

नाशिक : विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या स्वाक्षरीचा संग्रह असलेल्या ‘स्वाक्षरीचे जग’ या मिलिंद चिंधडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. स्वाक्षरींच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी महाराष्टÑ समाज सेवा संघाचे सरचिटणीस सुधाकर साळी यांनी, या पुस्तकामुळे अनेकांना स्वाक्षरी मागे दडलेले जग कळेल तसेच स्वाक्षरी छंदाची प्रेरणा मिळेल, असे सांगितले. प्रसाद देशपांडे यांनी या पुस्तकातील स्वाक्षऱ्यांवरून १९६८ ते १९७४ या काळातील बरीच मंडळी पाहता आल्याचे नमूद केले. स्नेहालय आणि विद्यार्थी साहाय्य समिती संस्थेचे विश्वस्त रमाकांत तांबोळी यांनी, या पुस्तकामुळे स्वाक्षरीतून दुर्मीळ व्यक्तींची भेट आणि तिच्या कार्याचा परिचय होईल, असे सांगितले. तर लेखक अ‍ॅड. चिंधडे यांनी एका छंदातून दुसरा छंद कसा लागला ते सांगतानाच स्वानुभव कथन केले. जयंत कुलकर्णी तसेच रमेश पडवळ यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. पुस्तकाचे प्रकाशक हरिओम प्रकाशनचे दीपक पाठक यांचा सत्कार मुक्ता चिंधडे यांनी केला.

Web Title: Enthusiastic publication of the book Signature World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Nashikनाशिक