शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

उत्साहाचे वातावरण : सोशल मिडियावर ‘मैत्री’ला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 18:38 IST

अनेकांनी ‘फ्रेण्डशिप डे’चे शनिवारी संध्याकाळी सेलिब्रेशन करत छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करणे पसंत केले. शहरातील बाजारपेठ सजली असून, तरुणाई हा मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्दे  ‘संडे’ला  ‘फ्रेण्डशिप सेलिब्रेशन’विविध कट्टे मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपने गजबजण्यासाठी सज्ज झाले

नाशिक : आॅगस्ट महिन्याच्या पहिला रविवार (दि.५) सर्वत्र ‘फ्रेण्डशिप डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरमैत्रदिनाचे वारे शनिवारपासूनच सोशल मीडियावरही वाहू लागले. अनेकांनी आपल्या वॉलवर ‘मैत्री’चे गोडवे गाण्यास प्रारंभ केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाइल, कव्हरफोटो,  डीपी, बदलण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींविषयीचे प्रेम व त्यांच्या मैत्रीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारे छायाचित्र, सुविचारांची देवाण-घेवाणही होऊ लागली आहे. अनेकांनी ‘फ्रेण्डशिप डे’चे शनिवारी संध्याकाळी सेलिब्रेशन करत छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करणे पसंत केले.

शहरातील बाजारपेठ सजली असून, तरुणाई हा मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जेव्हा रक्ताचे नाते फोल ठरते तेव्हा मैत्रीचे नाते उपयोगी पडते’ असे बोलले जाते. मित्र, मैत्रीण अन् त्यांच्यातले मैत्रीचे बंध हे अधिकाधिक घट्ट होत जावे यासाठी दरवर्षी तरुणाई आॅगस्टचा पहिला रविवार ‘मैत्र दिन’ म्हणून साजरा करतात. या दिनाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या दिनाची ‘क्रेझ’ दिसते. हा दिवस अविस्मरणीय म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरा करण्यासाठी तरुणाईने विविध बेत आखले आहेत. शहराजवळील पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट, मिसळ पॉइंट, कृषी पर्यटन केंद्र आज गजबजणार आहे. पूर्वसंध्येला तरुण-तरुणींनी शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरात गर्दी आपल्या मित्र-मैत्रिणींना द्यावयाच्या भेटवस्तू तसेच मनगटावर बांधायचे मैत्रिबंध, अंगठी, शुभेच्छापत्रे, टेडिबेअर, परफ्युम, मैत्री अधोरेखित करणारे की-चेन, कॉफी मग, फोटो-फ्रेम, घड्याळे अशा विविध वस्तूंना मागणी वाढली आहे.

मैत्रिदिनाचे वारे शनिवारपासून वाहू लागल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत व कॉलेजरोड परिसरात दिसू लागले होते. यंदा बाजारात उपलब्ध झालेल्या विविध वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. भेटवस्तू महागल्यामुळे यंदा मैत्री दिन बहुतांशी ग्रुपने साजरा करण्यास पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. शहराजवळचे विविध कट्टे मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपने गजबजण्यासाठी सज्ज झाले आहेत. काहींनी सिनेमांचाही बेत आखला आहे.  ‘संडे’ला  ‘फ्रेण्डशिप सेलिब्रेशन’ सर्वत्र बघावयास मिळणार आहे.

 

 

टॅग्स :Friendship Dayफ्रेण्डशीप डेNashikनाशिकSocial Mediaसोशल मीडिया