तिन्ही अनी आखाड्यांचे ध्वज दाखल
By Admin | Updated: August 17, 2015 23:54 IST2015-08-17T23:50:35+5:302015-08-17T23:54:13+5:30
तिन्ही अनी आखाड्यांचे ध्वज दाखल

तिन्ही अनी आखाड्यांचे ध्वज दाखल
नाशिक : साधुग्राममध्ये बुधवारी (दि.१९) दिगंबर, निर्मोही, निर्वाणी या तिन्ही अनी आखाड्यांत ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी आखाड्यांमध्ये तयारी सुरू आहे. तिन्ही अनी आखाड्यांचे ध्वज सोमवारी (दि.१७) दाखल झाले.
ध्वजारोहणासाठीची आखाड्यांत तयारी अंतिम टप्प्यात असून, विधीवत पूजन करून ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत. दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज पाच रंगाचा, तर निर्वाणीचा लाल आणि निर्मोही अनी आखाड्याचा ध्वजेचा रंग पांढरा आहे. तीन महिने आखाड्यांचे ध्वज तयार करण्यासाठी लागले. ध्वजावरील इष्टदेव हनुमानाच्या निशाणीचे चित्र प्राची पोद्दार यांनी रेखाटले. मुंबईत ध्वजावर नक्षीकाम करण्यात आले. पोद्दार कुटुंबीयांच्या आॅल इंडिया इंडस्ट्रीजने ध्वज तयार करण्याचे काम हाती घेतले होते. ध्वज निर्मितीसाठी त्यांना अशोक नागपुरे, संतोष यादव, रोहन यादव यांचे सहकार्य मिळाले. हनुमानाचे विधीवत पाठ सुरू असताना ध्वजाचे काम पूर्ण करण्यात आले. हनुमान चालिसाचे ११०० पाठ या काळात करण्यात आले. दीड बाय तीन फूट हनुमानाची निशाण ध्वजावर साकारण्यात आली आहे. श्लोकाप्रमाणे धाग्यामध्ये रंग भरण्यात आले आहेत. परिवाराला ध्वजा तयार करण्याचा योग मिळाल्याने आनंद झाला. तिन्ही अनी आखाड्यांच्या महंतांनी ध्वजा तयार करण्याला मान्यता दिली. यावेळी महंत भक्तिचरणदास, महंत वैष्णवदास, महंत राजेद्रदास, महंत धर्मदास, महंत परमात्मादास, अरविंद मिश्रा उपस्थित होते. (प्रतिनिधी)